नांदुरा शहरातील डिजिटल बोर्ड/ बॅनर बनविणारे तसेच लावणारे यांची मिटींग
पोलीस स्टेशन नांदुरा येथे 18.45 ते 19.30 वा. दरम्यान नांदुरा शहरातील डिजिटल बोर्ड/ बॅनर बनविणारे तसेच लावणारे यांची मिटींग घेण्यात आली. मिटींग दरम्यान आक्षेपार्ह बोर्ड/ बॅनर तयार करू नये तसेच तसे बोर्ड, बॅनर लावु नये तसेच लावतांना कोणत्याही परिसरात कोठेही कोणतेही बोर्ड, बॅनर लाऊ नये, दरवर्षी ज्या ठिकाणी लावण्यात येतात त्याच ठिकाणी लावावे,
जेणेकरून त्यापासून कोणताही अनुचित प्रकार घडून येणार नाही, तसेच बोर्ड, बॅनर तसेच त्याबाबत नगर परिषद व पोलीस स्टेशन ची रितसर परवानगी घ्यावी.बोर्ड, बॅनर तयार करण्याकरीता ज्यांचेकडुन ऑर्डर घेण्यात आली त्यांचे नावासह बोर्ड, बॅनर ची यादी आपणांकडे ठेवावी. याप्रमाणे आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या मीटिंग करीता 12 बोर्ड, बॅनर बनविणारे तसेच लावणारे उपस्थित राहिले.