वडनेर भोलजी येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांची धडक मोहीम
मलकापुर:- बरेच दिवसांपासून भुसावळ ते अकोला हि बस भुसावळ वरुन मलकापूर ला सकाळी सात वाजे दरम्यान येणारी एस टी बस वडणेर भोलजी ला थांबा असतांनाही सर्वीस रोडने येऊन प्रवासी न घेता डायरेक्ट उड्डाणपूलावरुन निघून जात होती. तसेच दिवसभरात अजूनही काही बस गाड्या उड्डाणपूल वरून जातात म्हणून दि ९ फेब्रुवारीला मलकापूर चे डेपो मॅनेजर मुकूंद नाव्हकार यांच्या सोबत त्यांच्या कार्यालयात शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, मलकापुर शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, तालुका प्रमुख दिपक चांभारे, शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार,वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम, डॉ . विनोद घोंगे सह आदिंनी चर्चा करून यावर तातडीने तोडगा काढा व वडनेर येथे थांबा असलेल्या बसेस थांबत नसल्यास उड्डाणपूलावरच शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.
आज सकाळी ६ वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने व मा.सरपंच संतोष दिघे,पवन भालेराव यांच्या हाँटेल जवळ विद्यार्थ्यांसमवेत एक तास अगोदर येऊन थांबले, येवढ्या सकाळी डेपो मॅनेजर मुकूंद नाव्हकार यांना फोन लाऊन आज ती गाडी खालील सर्वीस रोड ने येऊन विध्यार्थ्यांना , प्रवाशांना घेऊन गेली त्यांचा महसूल वाढला व शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांमुळे आमची शिक्षणाची सोय झाली असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.