Breaking News
recent

श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयामध्ये UPSC MPSC व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न.

 प्रतिनिधी प्रशांत पाटील नांदुरा

नांदुरा: स्थानिक श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथे आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन केंद्रा अंतर्गत प्राचार्य डॉ दिलीप हांडे यांचे मार्गदर्शनामध्ये पुणे येथील द इंन्फिनीटी अॅकेडमी चे संचालक अमीत डहाने यांचे एमपीएससी, युपीएससी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ अलका मानकर होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून द इंन्फिनीटी अॅकेडमीचे अमीत डहाणे व साई अॅकेडमीचे प्रा कौसकर सर उपस्थित होते.या वेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन प्रा अमीत डहाणे सर व प्रा कौसकर सर यांनी केले.सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पुर्वतयारी,नियोजन व त्याची अंमलबजावणी करुन त्यामध्ये यशस्वी कसे व्हावे या संदर्भातील सखोल मार्गदर्शन केले व आजच्या युगामध्ये सरकारी नोकरी किती महत्त्वाची आहे हे सुद्धा सांगितले

या कार्यक्रमाचे आयोजन करीअर मार्गदर्शन केंद्रांचे समन्वय डॉ मुळुक सर व सहसमन्वय डॉ मानकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेश मुळुक यांनी तर सूत्रसंचालन कु निशा बोरसे हीने केले .अध्यक्षीय भाषण डॉ मानकर मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन कु गायत्री पेठकर हीने केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

Powered by Blogger.