पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जिवघेना हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना जेरबंद करून तत्काळ कारवाई करा -स्वराज्य बहुउद्देशिय पत्रकार संस्थॆची मागणी
नांदुरा :-( प्रतिनिधी) काल दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे सायंकाळी निर्भय बनो या कार्यक्रमात जात असताना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला.वागळे ज्या कार मधे बसले होते त्या कारवार सलग तीनवेळा दगडफेक,शाईफेक व अंडे फेकून कारची तोडफोड केली.यात गाडीतील काही जण जखमी झाले.आपले मत मांडण्याचा प्रत्येक भारतीयाला लोकशाहीने अधिकार दिला आहे.पण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना जर आपलं मत मांडण्यापासून रोखण्यासाठी जीवघेणे हल्ले होत असतील तर भारतात लोकशाही जिवंत आहे काय हा ही संशोधनाचा विषय आहे.
तरी या झालेल्या हल्ल्याचा आम्ही पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो व संबंधित दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वराज्य बहुउद्देशिय पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमर रमेश पाटील,कोषाध्यक्ष योगेश धोटे,हरिभाऊ जुमडे,देवेंद्र जयस्वाल,नजीर रजवी,सचिव प्रफुल्ल बिचारे,प्रकाश खंडागळे,पुंडलिक काळे,भागवत पेठकर,मनोज धोटे ,दिनकर पाटील उपस्थित होते