नांदुरा येथे रंगला पोलीस प्रशासन व पत्रकार संघात क्रिकेटचा सामना
कायदा व सुव्यवस्था राखन्यासोबत शारिरीक,मानसिक स्वास्थ राखण्याचा प्रयत्न...
(श्रीकांत हिवाळे (प्रतिनिधी)
सततच्या कामाचा ताण,व्यस्त दिनचर्या, नेहमीच आरोपी,गुन्हे,भांडणे,कोर्ट, कचेऱ्या,खटले प्रशासकीय जबाबदाऱ्या या दातृत्वात व्यस्त राहून सामाजिक सुरक्षेसाठी सदैव तयार असलेल्या नांदुरा पोलीस प्रशासन संघ व समाज माध्यमातून लेखणीद्वारे निर्भीड वास्तव मांडणारे नांदुरा पत्रकार संघ यांच्यात नमो चषक सुरू असलेल्या मैदानावर दिनांक ०९ फेब्रुवारी ला सकाळच्या आल्हाददायक वातावरणात अतिशय खेळीमेळीत क्रिकेटचा सामना रंगला होता.नेहमीच कायदा,सुरक्षा यासारख्या कामाचा मानसिक ताण असणाऱ्या पोलीस प्रशासन व पत्रकार बांधव यांचा कामाचा उत्साह वाढावा आणि कामासोबतच आपापसात उत्तम सलोखा, समन्वय राहावा या हेतूने या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते .अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांचे तब्येतीकडे तसेच शारीरिक,मानसिक स्वास्थ्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. अशा प्रकारच्या खेळांच्या आयोजनातून त्यांचे शारीरिक मानसिक संतुलन राखण्यात मदत होते, म्हणून नियमित अश्या प्रकारच्या सामन्यांचे आयोजन करण्यात यावे असे यावेळी नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आणि पोलीस संघाचे कर्णधार श्री विलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .
या सामन्यात पोलीस संघाने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत उत्कृष्ट खेळ करीत पत्रकार संघसमोर निर्धारीत आठ षटकात ९५ धवांचे लक्ष्य ठेवले होते.यामध्ये नांदुरा पो स्टे चे पो निरीक्षक विलास पाटील यांनी चौकार,षटकार खेचत महत्त्वपूर्ण धावा केल्या तसेच बाकी खेळाडूंनी त्यांना उत्तम साथ दिली .गोलंदाजी करतांना किशोर इंगळे यांनी महत्त्व पूर्ण २ विकेट घेतल्या .प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करतांना नांदुरा पत्रकार संघातर्फे सुरवातीला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली परंतु त्यांना मात्र निर्धारित आठ षटकात ६० धावापर्यंतच मजल मारता आली आणि पोलीस संघ ३४ धावांनी विजयी झाला .
नांदुरा पोलीस संघातर्फे नांदुरा पोलीस निरीक्षक सर्वश्री विलास पाटील,आकाश भोलणकार,दीपक सोळंके,रवी सोळंके,पंकज वावगे,अनंता वराडे,सुनील सपकाळ,सुनील शुशिर,शैलेश बहादूरकर,राहुल ससाणे आणि पत्रकार संघातर्फे सर्वश्री शिवाजी चिमकर ,कर्णधार विलास निंबोळकर,उपकर्णधार लक्ष्मण वक्टे,संतोष तायडे,विठ्ठल भातुरकर,भागवत दाभाडे,किशोर इंगळे,रतन डोंगरदिवे,विठ्ठल भातुरकर,प्रशांत ढवळे,अरुण सुरवाडे,ओमसाई फाउंडेशन चे सहकारी खेळाडू किरण इंगळे,आनंद वावगे,नितीन ठाकरे,प्रवीण परखेडे,सचिन पुंडे, यांनी टीम मध्ये सहभाग घेतला होता. सौहार्दपूर्ण वातावरणात रंगलेल्या या क्रिकेट सामन्याचा दोन्ही संघातील खेळाडूंनी क्रिकेटच्या खेळाचा मनसोक्त आनंद घेतला तसेच आगळ्या वेगळ्या क्रिकेट सामन्याची नांदुरा शहरातील क्रिकेट प्रेमींना एक सुंदर मेजवानी मिळाली.या सामन्यासाठी नमो चषक आयोजकांचे सहकार्य लाभले.