दोन महिन्यापासून शेतकऱ्याच्या नोंदीसाठी चकरा
एक आठवड्यापासून ग्रामसेविका नसल्यामुळे गावकरी व ग्रामपंचायत रामभरोसे
श्रीकांत हिवाळे नांदुरा
नांदुरा तालुक्यातील धानोरा खुर्द ग्रामपंचायतच्या सचिव सोळंके मॅडम यांच्याविरुद्ध शेतकऱ्याने गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.याबाबत सविस्तर असे की.पिक अनुदान मिळावे यासाठी ग्रामपंचायत ठरावामधे शेतकऱ्याच्या नावाची नोंद असणे आवश्यक आहे.करिता शेतकरी श्री रमेश पाटील यांनी २ महिन्यात ५ वेळा धानोरा खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सोळंके मॅडम यांना भेटून पिक अनुदानासाठी ग्रामपंचायत ठरवामधे नावाची नोंद घेण्याची विनंती केली तरीदेखील सोळंके मॅडम यांनी नोंद घेतली नाही.
तसेच गेल्या शुक्रवार पासून सोळंके मॅडम यांचे ग्रामपंचायला दर्शनच झाले नाही.ग्रामसेविका सलग एक आठवडा गैरहजर राहिल्यामुळे व काम करण्याची मानसिकता नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना/गावकऱ्यांना याचा त्रास होत आहे.ग्रामपंचायत धानोरा रामभरोसे असल्यामुळे व शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण कामांत दिरंगाई झाल्यामुळे त्रस्त शेतकरी रमेश पाटील यांनी आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी या बाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दिली आहे.