पुरोगामी पत्रकार संघटनेच्या संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी कैलास खोट्टे यांची निवड
शेगांव येथील शासकीय विश्राम गृहात रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी पुरोगामी पत्रकार संघ भारत या पत्रकार संघटनेच्या शेगांव, खामगाव,संग्रामपूर,नांदुरा येथील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या आदेशाने संपन्न झाल्या असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ हे होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण मोरे विदर्भ अध्यक्ष होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून पूषगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन मार्गदर्शन करण्यात आले.पुरोगामी पत्रकार संघाच्या संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी कैलास खोट्टे दैनिक अधिकारनामा जिल्हा प्रतिनिधी यांची नियूक्ती करण्यात आली.तसेच उपाध्यक्षपदी दीपक सुरतकार यांची निवड करण्यात आली.