तपस्वी संत श्री बाबाजी सारखी निस्वार्थ भक्ती करा - दीपक महाराज शास्त्री
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भागवत सप्ताहास सुरुवात
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम)
महान तपस्वी श्री संत काशिनाथ बाबा यांच्या ५८ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेच्या प्रथम दिवशी श्रीमद् भागवत कथेत ज्या प्रमाणे काशिनाथ बाबांनी संपूर्ण आयुष्य देवाला निस्वार्थ पणे समर्पित केले तश्याच प्रकारे संसार रुपी भवसागरतून तरण्यासाठी मानवाने सुद्धा निस्वार्थ भक्ती करावे असे प्रतिपादन कथा प्रवक्ते ह.भ.प.दीपक महाराज शास्त्री यांनी पहिल्या दिवसाच्या भागवत कथेत केले
दरवर्षी मोठ्या उत्साहाने मानोरा तालुक्यातील तपस्वी भूमी श्री क्षेत्र अमरगड वाईगौळ येथे काशिनाथ बाबा यांचा समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षी सुद्धा दि.३१ जानेवारी २०२४ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमद् भागवत सप्ताह दरम्यान दि. १ फेब्रुवारीला ह.भ.प.मंगेश महाराज कडू, शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रात्रीला जगदीश महाराज, ब्रह्मनाथ यांचे कीर्तन, शनिवार दि.३ फेब्रुवारीला मधुकर महाराज, गायमुख नगर यांचे कीर्तन, नाथांची अभंगवाणी भारुड ४ फेब्रुवारीला, रविवारी ह.भ.प.खुशाल मुकुल वैद्य देवळी, मांगीलाल महाराज बुटीकर. सोमवार दि.५ फेब्रुवारी ला भजन संध्या. मंगळवार दि. ६ तारखेला घासीराम महाराज, मारुती महाराज, प्रकाश महाराज उल्हास महाराज, संजय महाराज, पंडित महाराज यांचे बंजारा भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. उपरोक्त विविध धार्मिक कार्यक्रम रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत महान तपस्वी संत काशिनाथ बाबा मंदिर परिसरामध्ये उत्सव समिती व समस्त वाई गौळ वाशीयांकडून आयोजित करण्यात आलेले आहेत.
श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञात ह.भ. प. श्रीराम महाराज चिखलीकर आणि जीवन महाराज आळंदीकर (वाई गौळ) यांचे मार्गदर्शन राहणार आहे.
व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प. मधुकर महाराज खोडे यांच्या अमृतवाणीतून ७ तारखेला सकाळी नऊ वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. तपश्चात दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण आयोजित करण्यात येणार आहे