मनसे पदाधिकायांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या : मागणी
शेतीमालावर १ टक्का बटाव घेणाऱ्या व्यापाऱ्यांला जाब विचारण्यासाठी गेलेल्या चिखली येथील मनसे पदाधिकाऱ्यांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणेदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
चिखली येथील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत तिरुपती जिनिंगचे गोविंद अशोक अग्रवाल यांनी शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या एक टक्का बटाव ही आमची कामाई आहे असे म्हणत जाब विचारण्यासाठी गेलेले मनसे पदाधिकारी राजेश परिहार, नारायणबाप्पू देशमुख, प्रदीप भवर यांचे अंगावर कामावर असलेले परप्रांतीय कामगार पाठवून मारहाण केली. तसेच महाराजा अग्रेसन खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक बाबूलाल अग्रवाल यांनी आमचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर राजकीय सुडापोटी खंडणीचे खोटे आरोप करीत गुन्हा क्र. ७२/२०२४ नुसार खोटे गुन्हे दाखल केले. तरी दाखल केले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात येऊन शेतकऱ्यांची लूटमार करीत असलेल्या बेकायदेशीर खाजगी अडत व्यापाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
निवेदनावर मनसे कार्यकर्ता,.- पवन शेंडे, मोहन धामोले, बालू कुकड़े, अतुल अरदले, रितेश राउत, गौरव सुरलकर, संकेत सुके, निखिल भटकर, अंकुश मेतकर प्रकाश मात्र, सागर सांगोले, बालू तलोकार यांच्या सह्या असून यावेळी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.