जागतिक मराठी राजभाषा दिन संपन्न
नांदुरा: प्रतिनिधी प्रशांत पाटील स्थानिक श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथे दि 27 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप हांडे यांचे मार्गदर्शनामध्ये कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जागतिक मराठी राजभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिवस मराठी विभाग प्रमुख प्रा डाॅ सुनंदा रेवसे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये इंग्रजी विभाग प्रमुख प्रा गायकवाड सर, वाणिज्य विद्याशाखा विभाग प्रमुख प्रा माहुरे सर, विशेष अतिथी म्हणून इंग्रजी विषयाचे प्रा रामेश्वर सायखेडे उपस्थित होते जे नुकतेच मराठी विषयामधुन नेट परीक्षा उत्तीर्ण झाले.त्याबद्दल त्यांचा मराठी विभागातर्फे सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु बोरसे हीने केले तर प्रास्ताविक प्रा अनंता लाहुडकार यांनी केले.या वेळी प्रा विनोद वेरूळकर,प्रा गायकवाड सर,प्रा माहुरे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन मराठी भाषेची महती विषद केली.अध्यक्षीय भाषणामधुन मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ रेवसे मॅडम यांनी मराठी भाषेचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला व मराठी भाषेची वस्तुस्थिती व महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु भिडे हीने केले.