Breaking News
recent

वांगदरी ग्रामपंचायत घरकुल प्रकल्प योंजनेस द्वितीय पुरस्कार.



वांगदरी ग्रामपंचायतीने राबविलेल्या घरकुल प्रकल्पास राज्यातील नाशिक विभागामध्ये अमृत महाआवास अभियाना अंतर्गत व्दितीय पुरस्कारासाठी निवड होवून दि. १२ मार्च रोजी नाशिक येथे आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे हस्ते ग्रामपंचायतीस सम्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करणेत आला.

यांसदर्भात ग्रामपंचायतीने प्रसिध्द केलेल्या पत्रकांत म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे व जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासनाची ३९ गुंठे जागा ग्रामपंचायतीकडे एक खास बाब म्हणुन वर्ग करुन घेतली. व सदर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यात दुसन्या क्रमांचा आदर्श पमदर्शी घरकुल प्रकल्प उभा करण्याचे काम ग्रामपंचायतीने हाती घेतले. सदरचा प्रकल्प ग्रामपंचायतीने बारकाईने लक्ष देवून स्लॅबच्या ३५ घरकुलांचे सर्व सुविधांनीयुक्त असे अतिशय दर्जेदार काम करुन घेतले आहे. येथील रियल फॉर फाऊंडेशन यांनी २२ लाखाचा निधी दिलेला आहे,

सदर प्रकल्पास आकार देणेकरीता राजेंद्रदादा नागवडे व सौ. अनुराधा नागवडे यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागरसाहेब, विद्यमान कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरसाहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरेसाहेब, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे पठाडेसाहेब व साळवेसाहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) गुंजाळसाहेब, तत्कालीन गटविकास अधिकारी राम जगताप, विद्यमान गटविकास अधिकारी राणीताई फराटे. विस्तार अधिकारी मोशिन मालजप्ते, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अनिलराव जगताप य नवनाथराव गोरे, माजी सरपंच दगडू सोनलकर, रामदास भडांगे, महेशशेठ नागवडे, आदेशशेठ नागवडे यांनी विशेष परिश्रम घेवून कामास चालना दिली. सदर प्रकल्पाच्या अंतीम टप्यात सरपंच संजयकाका नागवडे यांच्यासह उपसरपंच सी छाया मासाळ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य

ग्रामविकास अधिकारी लक्ष्मणराव मुरकुटे यांनी विशेष परिश्रम घेवून प्रकल्प पूर्ण केला.

सदर प्रकल्पाचे काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे झाले असुन त्याकरीता सर्व मान्यवरांनी अतिशय बारकाईने लक्ष देवून प्रकल्प दर्जदार होणेकरीता प्रयत्न केले. त्यास यश आले असुन सदर प्रकल्पास महाराष्ट्र राज्याच्या नाशिक विभागामध्ये व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दि. १२ मार्च रोजी नाशिक येथे इ ालेल्या भव्य सांरभात सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे व अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे हस्ते आणि उपायुक्त कोळसेमॅडम, जि.ग्रा. वि. यंत्रणेचे साळवेसाहेब, श्रीगोंदा गटविकास अधिकारी राणीताई फराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत वांगदरीचे सरपंच संजयकाका नागवडे, महेशशेठ नागवडे, आदेशशेठ नागवडे, शिवाजी चोरमले, तुषार नागवडे, विष्णु आबा मोहिते, अशोक पारखे, हनुमंत काटे, धनंजय चोरमले, विकास अडागळे, गणेश दिवेकर, दिलीप मासाळ, अशोक फराटे, हेमंतकाका नागवडे, बाबासाहेब दाते. रामचंद्र गवळी, देविदास नागवडे, भाऊसाहेब गवळी, ग्राम विकास अधिकारी लक्ष्मणराव मुरकुटे यांना पुरस्कार प्रदान करणेत आला.

वांगदरी ग्रामपंचायतीने राजेंद्रदादा नागवडे व सौ. अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजनबध्द व परिश्रमपूर्वक हा दर्जेदार पद्मदर्शी प्रकल्प उभा केला व त्यास विभागीय पातळीवरील व्दितीय क्रमांचा पुरस्कार मिळाला ही बाब वांगदरी गावच्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानाची असुन गावच्या नावलौकीत भर घालणारी आहे. समस्त वांगदरी गावचे ग्रामस्थ व घरकुल योजनेचे लाभाधारक यांच्याकडून नागवडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करणेत येत आहेत.

Powered by Blogger.