माळी घोगरगाव येथे पवित्र क्रसाच्या वाटेची भक्ती मोठ्या भक्ती भावाने संपन्न
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
फ्रान्सिसकन धर्मगुरु फा. जाकियर बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या व पवित्र वेलांकनी मातेच्या तिर्थक्षेत्राने प्रसिद्धीपावलेल्या माळी घोगरगाव येथे टिळकनगर धर्मग्रामाच्यावतीने प्रायश्चित काळा निमित्तआयोजित पवित्र कुसाच्या वाटेची भक्ती मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाली .मोळी घोगरगाव येथील ख्रिस्तराजा चर्चमध्ये भाविकांनी पवित्र क्रसाच्या वाटेची भक्ती केली. तसेचयाप्रसंगी पवित्र मिस्सा बलिदान अर्पण करण्यात आला . तत्पूर्वी भाविकांनीप्रायश्चित संस्कार स्विकारला .याप्रसंगी भाविकांनी फा. जाकियर बाबा यांच्या कबरेचे दर्शन घेवून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच पवित्रवेलांकनी मातेच्या चर्चमध्ये जाऊन भक्तीभावने प्रार्थना केली. त्यानंतर प्रीतिभोजन करण्यात आले.
हि पवित्रकुसाची वाट व आध्यात्मिक सहल यशस्वी करण्यासाठी माळी घोगरगाव येथील ख्रिस्तराजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू व संत जोसेफ हायस्कूलचे मुख्याध्यापक फा.आशिष म्हस्के यांनीविशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले तसेच सहाय्यक धर्मगुरू फा. प्रविण वानखेडे यांचेही आभार मानण्यात आले ह्या आध्यत्मिक सहलीचे प्रेरणास्त्रोत टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फा. मायकल वाघमारे वसहाय्यक धर्मगुरू फा.संजय पठारे , आनंद विहारच्या सुपिरियर सिस्टर उषा ,सिस्टर पुनम व या आध्यात्मिक सहलीसाठीविशेष परिश्रम घेणारे पॅरिश कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र भोसले सर सहलीसाठीस्कूल बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल डि पॉलचे फादरथॉमस यांचेही विशेष आभार मानले तसेच बसचालक ववाहक विशाल तेलोरे , प्रमोद संसारे, नितिन जाधव , अतिशसाळवे व राजुरी येथील जॉनकदम व श्री बनसोडे व उपस्थित भाविकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले .या आध्यात्मिक सहलीत सुमारे १०० भाविकांनी सहभाग घेतला .सर्वांचे आभार .