जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न
महिलांनी लघु उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे.. केंद्रियराज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांचे प्रतिपादन.
मुंबई( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) :-
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीचा भव्य महिला मेळावा मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सौ.सीमाताई आठवले तसेच महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री ना.मंगलप्रभातजी लोढा, माजी राज्यमंत्री अविनाशजी महातेकर ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपाइं महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामळू आणि सूत्रसंचालन रिपाईच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा तथा राज्य सरचिटणीस ऍड .अभयाताई सोनवणे यांनी केले..
याप्रसंगी बोलताना ना. रामदासजी आठवले म्हणाले की महिलांच्या हक्कासाठी संसदेत मी जाणार तुमचे हक्क घेऊन पुन्हा परत येणार.असे म्हणत ते पुढं म्हणाले महिलांनी गृह उद्योग सुरू केले पाहिजेत; लघु उद्योगात महिलांनी पुढे आले पाहिजे. कुटुंब चांगलं राहण्यासाठी आता महिलांनी सुद्धा छोटे मोठे लघु उद्योग उभारून स्वयंरोजगार करणे आवश्यक आहे असं मत ना.रामदासजी आठवले.यांनी मांडले. आपल्या महिलांनी बचत गट सुरू केले पाहिजेत असा सल्ला ना. रामदासजी आठवले साहेबांनी दिला. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.