स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन हवे-- ठाणेदार संदीप काळे
दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 394 व्या जयंती निमित्त पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण तर्फे ग्राम उमाळी, दाताला, वडोदा येथील शाळेमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वकृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. आयोजित करण्यात आलेल्या सदर स्पर्धेचे दि. 15.03.2024 रोजी जिल्हा परिषद शाळा उमाळी येथे बक्षीस वितरण करण्यात आले असून सदर कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अल्प आहे. या भूमीचे ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे. दिवसभराचे मिनिट टू मिनिट नियोजन करावे. वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करुन अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे. अभ्यासक्रमातील संबंधित विषयांची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करुन आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी तरच यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे यांनी केले.