कृष्णा कराळे याची क्रूर हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी - मराठा पाटील युवक समिती
नांदुरा
दि. 30 जुलै रोजी नांदुरा तहसीलदार साहेब यांना शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या 14 वर्षीय मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना ही समाजामध्ये मन सुन्न करणारी असून मराठा पाटील युवक समिती या घटनेची अत्यंत तीव्र शब्दात निषेध करते. समाजामध्ये अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक असून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही
यासाठी निष्पाप बालक कृष्णा हत्ये प्रकरणी जलद न्यायालय कडून चौकशी होऊन हत्ये मध्ये सामील नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी अश्या घटने मुळे समाजा मधे खूप रोष आहे आज तहसीलदार साहेब नांदुरा यांना मराठा पाटील युवक समिती वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी मराठा पाटील युवक समिती मा.जिल्हाध्यक्ष प्रवीण उर्फ छोटू पाटील, राहुल घाटे,विष्णू बाठे,अतुल गव्हाड, सतीश लंजुळकर, पंकज ठाकरे सर,प्रकाश बगाडे, लक्ष्मण वक्ते,सागर जुमडे,अविनाश वाकेकर, विजय महाजन,प्रितेश गावंडे,शुभम चिंचोळकर,अतिश काटे,कपिल पाटील,सौरभ बनसोड, मुकेश फणसे,विलास देशमुख, पद्माकर ढोले , ऋषिकेश अरवाडे,संतोष लाहुडकर,भगवान धांडे,दिलीप कोल्हे, श्रीकृष्ण चोपडे व इतर समाज बांधव हजर होते.