विजय इंगळे यांनी राष्ट्रभक्ती च्या कार्यात समर्पितपणे सेवा दिली..सौ.अपर्णाताई संजयजी कुटे
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
सोनाळा येथील भूमिपुत्र विजय नारायणराव इंगळे यांनी 22 वर्ष CRPF मधे काम करून या राष्ट्रभक्ती च्या कार्यात समर्पित पणे सेवा देण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन विश्वमांगल्य सभेच्या विदर्भ प्रांत संयोजिका सौ.अपर्णाताई संजयजी कुटे यांनी सोनाळा येथे आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात काढले.गणेशभाऊ गोतमारे मित्र परिवाराने या नागरी सत्कार समारोहाचे आयोजन केले होते.यावेळी सौ.अपर्णाताई कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या की विजय इंगळे हे CRPF मधून सेवा निवृत्त झाले आहेत व त्यांच्या पत्नी सौ.इंद्रायणी विजय इंगळे ह्या तहसीलदार म्हणून गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून काम करीत आहेत.या कुटुंबाचे समर्पित योगदान देश कार्यासाठी आहे अशा त्या म्हणाल्या.
2 ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता या सपत्नीक सत्कार समारोहाचे आयोजन सोनाळा येथील श्री.संत सोनाजी महाराज मंदिरात हा कार्यक्रम घेतला गेला.या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मधे भा.ज.पा.चे जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ देशमुख संग्रामपूर चे तहसीलदार योगेश्वर टोंपे,सोनाळा पोलीस स्टेशन चे ठाणेदार चंद्रकांत पाटील व विजय इंगळे यांचे आई वडील तथा सौ.इंद्रायणी गोमासे इंगळे यांचे आई वडील प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.सोनाळा येथील गणेशभाऊ गोतमारे मित्र परिवाराने सोनाळा गावकऱ्यांचे वतीने विजय इंगळे यांचा सपत्नीक नागरी सत्कार केला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश खोकले भाजपा संग्रामपूर तालुका उपाध्यक्ष यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रकाश बोदडे जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी यांनी केले.कार्यक्रमाला गावातील तथा परिसरातील शेकडो चे संख्येने नागरिक महिला पुरुष सहभागी झाले होते.