Breaking News
recent

गोपीनाथ मुंडे अपघात विमा शेतकऱ्याला त्वरित द्यावा अन्यथा आंदोलन करणार,--शिवसेना तालुकाप्रमुख विवेक देशमुख.



ग्रामीण प्रतिनिधी पंडित नरवाडे.       ‌. ‌‌‍.         

  हदगाव तालुक्यातील.  तळणी येथील शेख मुस्तफा या शेतकऱ्याचा सण 2022 या वर्षी अपघाती निधन झाले त्यांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा मिळण्यासाठी पूर्ण कागदपत्र दिले असून आज पर्यंत त्यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून ‌. मदत मिळाली नाही अपघात योजनेची तत्काळ अंमलबजावणी करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख विवेक देशमुख यांनी दिला आहे            ‌ ‌‌.        महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा देण्यात येत असतो त्या विम्यासाठी जे शेतकरी सर्पदंश विज पडून अपघात होऊन जर मृत्यू झाला त्या शेतकऱ्याला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा दोन लाख रुपयाचा  निधी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येत असतो पण हादगाव,-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्याचा अनेक वर्षापासून हा अपघात विमा मिळाला नाही  त्याची पूर्ण कागदपत्र दिले तरी दोन वर्षापासून त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अजून हा विमा.   मिळाला नाही त्यामुळे कर्मचारी व विमा कर्मचारी या अपघात  ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची अवहेलना करत आहे आधीच निसर्गाने शेतकऱ्याच्या घरातला करता पुरुष हिरावून नेला व कर्मचारी व विमा कर्मचारी  शेतकऱ्याच्या घरातला करता पुरुष हिरावू शेतकऱ्याची थट्टा करत आहे ज्या घरचा करता अपघाती गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय परिस्थिती निर्माण होते त्या कुटुंबाच्या परिस्थितीची दोन हात करीत  कुटुंब आपले जीवन जगात असताना आज दहा वर्षापासून महाराष्ट्रात सरकार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने अपघात विमा देत असते पण या कर्मचारी व विमा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन वर्षापासून जो विम्याचा परतावा अपघात ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मिळाला पाहिजे तो आजपर्यंत मिळाला नाही तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेना तालुकाप्रमुख विवेक देशमुख आंदोलन करणार याची सर्वस्वी जबाबदारी हे कर्मचारी व विमा कर्मचारी यांच्यावर राहील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा अपघात ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांना लवकरात लवकर मदत द्या  अन्यथा आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. ग्रामीण वार्ताहर

Powered by Blogger.