Breaking News
recent

शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांची एकाच महिन्यात यशाला गवसनी

सोपान विक्रीकर अधिकारी तर निवृत्ती आरोग्य सेवक म्हणून निवड. 

   ‌‌ ग्रामीण प्रतिनिधी.    ‌ ‌. पंडित नरवाडे.     

   हादगाव तालुक्यातील. ‌‌.           बरडशेवाळा येथील शेतकरी सोनबा राव .विठ्ठल राव मस्के यांचा मुलगा सोपान व निव्रती यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेत उच्च शिक्षण घेत एकाच महिन्यात दोघांनी यश संपादन करीत सर्वांसमोर दाखवले आहे.बरडशेवाळा येथील   एकत्रित कुटुंब असलेले सोनबा राव मस्के यांच्या घरामध्ये लहान मोठे व मुली बाळी धरून पन्नासहून अधिक  सदस्य संख्या असलेली शेतकरी कुटुंब आहे वडील स्वर्गीय विठ्ठलराव मस्के यांचे विचार आचरणात आणण्यात आजही एकत्रित कुटुंब पद्धतीचा आदर्श घेण्यासारखे कुटुंब आहे मस्के कुटुंब शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक जोडधंदा म्हणून गुळ कारखान्या सह हंगामानुसार एकजुटीने सर्वजण काम करतात आतापर्यंत या घराण्यात कोणीही साधे सेवक म्हणून पदावर नसताना सोपान मस्के व निव्रती मस्के दोघांनी एकत्रित आपल्याच जन्मभूमीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहावी पर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी अहमदपूर येथील विद्यालयात घेतले

 सोपान ने दहावीत 86 टक्के घेतले आणि बारावीत सायन्स मध्ये 72 टक्के घेतले नांदेड येथे शिक्षण येथील शिक्षण पूर्ण करून सोलापूर येथे बी ए एम एस पूर्ण केले जिद्दी आणि चिकाटीने अभ्यास करीत नुकत्याच झालेल्या एम पी एस सी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून राज्य विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली तर दुसरा भाऊ निव्रती ला दहावी 85% बारावी 81 टक्के आय बी एस वर्धा जिल्हा आरोग्य सेवक म्हणून निवड झाली एकाच महिन्यात दोन्ही भावाच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत असून या यशाबद्दल वडिलांसह सोपान व निवृत्ती त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडशेवाळा येथे सन्मान करण्यात आला यावेळेस महसूल मंडळ अधिकारी गोडबोले मॅडम, तलाठी. बिल.यु ईप्पर साहेब पोलीस पाटील दत्तात्रेय मस्के पिंपरखेड येथील माजी उपसरपंच ओम प्रकाश येवले. सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर. मुख्याध्यापिका गिरीबिडे मुख्याध्यापक एम एस कदम शिक्षक व शिक्षिका पत्रकार प्रभाकर दहिभाते. शालेय शिक्षण समिती गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते जिद्दी आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यश मिळतेच हे या दोघा भावंडाने दाखवून दिले

Powered by Blogger.