भूसंपादनाच्या मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने घेतले विष - उपविभागीय कार्यालयातील घटना
चांदुर रेल्वे ग्रामीण प्रतिनिधी
चांदूर रेल्वे उपविभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नांदगाव खडेश्वर तालुक्यातील मौजा सालोड येथील रामकृष्ण तुकाराम ढगे व इतर असे एकूण १३ नावे एकाच ७/१२ मध्ये असलेली सामाईक शेती निम्मन साखळी बृहत ल.पा.यो.प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात 2021 मध्ये गेली असून या शेतीचा मोबदला मिळावा म्हणून प्रशासनाकडे मागणी केली परंतु मोबदला न मिळाल्याने दिलीप रामकृष्ण ढगे या शेतकऱ्याने चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी कार्यालयात विष प्राशन केल्याने सदर शेतकऱ्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करत अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील मौजा सालोड येथील रामकृष्ण तुकाराम ढगे व इतर यांची सामाईक शेती गट क्रमांक 137 मधील क्षेत्रफळ 6.74 हे आर शेतजमीन निम्मन साखळी बृहत ल.पा.यो.प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात 2021 मध्ये गेली असून या सदर शेत जमिनीचे 1 करोड 85 लक्ष 46 हजार 350 रूपये मोबदला हा शेतकऱ्याला आपसी वादविवाद असलेल्याने प्रशासनाकडून देण्यात आले नाही व स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया मार्फत सदर शेतकऱ्याला 16.आक्टोबर 2024 ला हक्कासंबधीत दस्तावेज घेऊन उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती त्या संबंधात प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतला म्हणून सामाईक क्षेत्रातील शेतकरी दिलीप रामकृष्ण ढगे ह्यांनी आज चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी कार्यालयात विष प्राशन केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी यांनी स्थानिय पोलिसांच्या सहाय्याने सदर शेतकऱ्याला चांदूर रेल्वे येथिल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी भर्ती केले परंतु परीस्थिती व सुविधेचा अभाव असल्यामुळे ढगे यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.