Breaking News
recent

बार्टी कडून नेताजी सुभाष चंद्र बोस व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन



वसमत :सर्वप्रथम नेताजी सुभाष चंद्र बोस व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी श्री कम्प्युटर इन्स्टिट्यूट च संचालक श्रीराम वडे सर अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे मिलिंद आळणे ,गुरुनाथ गा डेकर समतादूत बार्टी हे होते.नेताजी सुभाष चंद्र बोस.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व.आजाद हिंद फौजी चे नेतृत्व .तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा ही प्रसिद्ध घोषणा .स्वतंत्र लढ्यातील त्यांचा त्याग आणि बलिदान नेहमीच स्मरणात राहील. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले.

 शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे.यावेळी श्रीराम वडे सर श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक व धनगर समाज तालुकाध्यक्ष यांनी सुभाष चंद्र बोस वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला सूत्रसंचालन सतीश कदम सर यांनी केले यावेळी प्रगती झुंझुलडे ,गौरी बोंगाणे ,गायत्री राऊत ,सानिका पडोळे, विश्रांती चांदणे, ऋषिकेश दळवी, रवी राणा कावळे, विजया श्री जया साळवे, गायत्री उदगीर, योगेश म्हात्रे, बजरंग गवारे ,आभार प्रदर्शन गंगाप्रसाद कारंजकर यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Powered by Blogger.