लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी स्वप्निल देशमुख यांची निवड
मतिन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर
बुलढाणा जिल्ह्यात आपल्या निर्भीड लिखाणाने वेगळी ओळख बनवणारे, बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या प्रयत्नात सर्व पत्रकारांमधील एकजुटीसाठी धडपडणारे, संग्रामपुर तालुक्यातिल वानखेड गावातिल रहिवासी श्री. स्वप्निल देशमुख यांची लोकस्वातंत्र्य प्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ते दै.सुपरभारत व विश्वप्रभात वृत्तपत्र व न्यूज चॕनेलचे जिल्हा प्रतिनिधी व युवा मराठा चॅनेलचे बुलढाणा ब्यूरो चिफ आहेत. त्यांची काम करण्याची जिद्द पाहून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी नियोजित बैठकीत सर्व मताने निर्णय घेऊन ही नियुक्ती केली आहे.येत्या नियमित मासिक विचारमंथन तथा स्नेहसंमेलन मेळाव्यात त्यांना नियुक्तीपत्र व संघटनेचे ओळखपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या नियुक्तीबध्दल बोलतांना संघटनेच्या ध्येय धोरणांच्या अधिन राहून ग्रामीण व शहरी पत्रकारांचे प्रश्न, व समस्या सोडवण्याबरोबरच आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मनोदय स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.